देवी-कालरात्री- नवरात्रीचा - सातवा- दिवस- Navaratri -special.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या सातव्या रूपाची म्हणजेच देवी ''कालरात्री'' ची पूजा केली जाते. कालरात्री हे देवीच्या नव दुर्गा स्वरूपांपैकी सातवे स्वरूप असून, देवीचे हे स्वरूप पहायला अतिशय उग्र आहें.
देवीचे स्वरूप जरी उग्र वाटत असले तरी देवी कालरात्री चे हेच स्वरूप भक्तांसाठी कल्याणकारी आहे .
देवी काल रात्री ही दृष्ट शक्तिंचा नाश करणारी आणि भक्तांचे रक्षण करणारी मानली जाते.
.देवी -स्कंदमाता- नवरात्रीचा- पाचवा -दिवस-navratri-special.
देवीचे-सातवे-रूप-कालरात्री- नवरात्रीचा - सातवा- दिवस-
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या नवदुर्गा स्वरूपांपैकी सातवी दुर्गा मानली जाणारी देवी 'कालरात्री' ची पूजा केली जाते.
'' या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेंण संस्थिता !
नमस्तस्येै नमस्तस्यै नमस्तस्येै नमो नमः !!
'' या देवी सर्व भूतेषु कालरात्री रूपेंण संस्थिता !
नमस्तस्येै नमस्तस्येै नमस्तस्येै नमो नमः !!
'' ऊँ कालरात्र्यैय नम: !
'' ऊँ फट् शत्रून संघाय घातय ऊँ '' !
''एकवेणी जापकर्णपूरा नग्नास्वरास्थित् ! लम्बोष्ठीकर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरिरीणी '' !!
'' वामपादोल्लसल्लोह लताकटक भूषण !
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा काल रात्री भयंकरी '' !!
देवीच्या या 'कालरात्री' स्वरूपाचा रंग काळा असून देवीचे केस विस्कटलेले आहेत. देवीचे हे विस्कटलेले केस समस्त ब्रह्मांडातील आकाशगंगांचे प्रतिनिधित्व करतात. देवीच्या श्वासातून जणू काही अग्निज्वालाच बाहेर पडत आहेत असे भासते.
![]() |
| देवी कालरात्री. |
देवी कालरात्रीला तीन डोळे असून तीचे हे डोळे तीन गुण रज ,सत्व आणि तम, तीन काळ भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ, तीन लोक पाताळ ,पृथ्वी आणि स्वर्गाचे प्रतिनिधित्व करतात .
देवी 'कालरात्री' ला चार हात असून देवीचे वाहन गाढव आहे.
देवी '' काल रात्री ''ने आपल्या हातात अनुक्रमे अभय मुद्रा, वरमुद्रा ,खडग आणि वज्र धारण केले आहे.
देवीचे हे हे स्वरूप अंधकाराचा समूळ नष्ट करणारे आहे. देवीचे हे स्वरूप अत्यंत भय उत्पन्न करणारे आहे. परंतु देवीचे हे उग्र रूप फक्त दृष्ट शक्तींचा विनाश करण्यासाठी आहे. देवीच्या भक्तांना देवीच्या या स्वरूपाची भीती वाटण्याची काही एक आवश्यकता नाही .
देवी ही आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून भक्तांचे कल्याण करणारी आहे. म्हणून देवी कालरात्रीला''कल्याणकारी'' असेही म्हणतात .
दृष्ट शक्ती देवीच्या फक्त नावाने थरथर कापतात. जो कोणी मनुष्य यम ,नियम आणि संयमाचे पालन करून देवी '' काल रात्री '' ची आराधना करतो.त्याला ब्रम्हांडातील सर्व सिद्धींचे दरवाजे खुले होतात.
देवीचे-सातवे-रूप-कालरात्री- नवरात्रीचा - सातवा- दिवस- Navaratri -special.
'' ऊँ ह्रि श्री क्ली दुर्गती नाशियै महामाये स्वाहा '' !
'' ऊँ ऐं प्रशमनं त्रेैलोैभ्यस्या अखिलेश्वरी !
एवमेव त्वथा कार्यस्मद् वैरिविनाशनम् नमो सें ऐं ऊँ '' !!
'' ऊँ यदि चापि वरो देयस्त्वयास्मांक महेश्वरी !
संस्मृता संस्मृता त्व नो हीसे थ: परमा पद: ऊँ '' !!
कालरात्री देवीची पूजा करणाऱ्या साधकाच्या मनाचा सहार चक्रात प्रवेश होतो .
![]() |
| देवी काल रात्री. |
देवीच्या नावाचे स्मरण मात्र केल्याने असूरी शक्ती, भूत प्रेत बाधा़ यांचा समूळ नाश होतो. ग्रहदोष असल्यास देवी काल रात्रीची आराधना केल्याने गृहदोषांचे निवारण होते.
देवी काल रात्री ही शुभ फळ देणारी आहे म्हणून तिला ''शुभंकारी ''असेही म्हटले जाते. देवीची उपासना करणारा सर्व प्रकारच्या भयांपासून म्हणजे जल, जंतु, रात्री वाटनारी भीती यातून मुक्त होतो.
कालरात्री देवीची शरण घेणाऱ्या भक्ताच्या सर्व शत्रूंचा नाश होतो.आणि तो या लोकात सुख भोगून पर लोकात सद्गती प्राप्त करतो.
देवीच्या कृपेने साधकाच्या सर्व संकटांचे निवारण होते. मनातील सर्व दृष्ट विचार नष्ट होतात. देवीची शरण आलेल्याला मग कसलीच भीती राहत नाही.
अशा या नवदुर्गेच्या सातव्या रूपाला , म्हणजेच देवी काल रात्रीला शत् शत् नमन.
''ऊँ शक्ती स्वरूपाय नमः '' !
आजचा रंग;- केशरी.
आजची देवी;- कालरात्री.


0 टिप्पण्या
हि वेबसाईट कोणतीही त्रुटी पूर्ण टिप्पणी स्वीकारत नाहीत.य़ाची कु्पया नोंद घ्यावी.