.देवी -स्कंदमाता- नवरात्रीचा- पाचवा -दिवस-devi-skandmata-in-marathi-navratri-special.


.देवी -स्कंदमाता- नवरात्रीचां- पाचवा -दिवस;-

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीचे स्कंदमता स्वरूपात पूजन केले जाते . नवरात्रीमध्ये देवीच्या विविध नऊरूपांची पूजा केली जाते आणि आपल्या जीवनातील संकटे ,समस्या दूर व्हावित, म्हणून प्रार्थना केली जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदा पासून सुरु होणारा हा नवरात्रोत्सव विजयादशमी पर्यंत चालतो.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पाचव्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीच्या कस्दंमाता स्वरूपाची पूजा केली जाते.

देवी स्कंदमता ही प्रेम ,माया, वत्साल्याची प्रतीक मानली जाते.


देवी- कुष्मांडा-नवरात्री-चा- चौथा-दिवस.- navaratri -special.


.देवी -स्कंदमाता- नवरात्रीचां- पाचवा -दिवस-navratri-special.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीच्या नवदुर्गास्वरूपांपैकी पाचवी दुर्गा म्हणजेच देवीच्या स्कंदमाता या स्वरूपाची पूजा केली जाते.

'' या देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रुपेंणसंस्थिता !
 नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः '' !!

देवीच्या नवदुर्गांपैकी देवीचे स्कंदमाता हे स्वरूप अति सौम्य वासल्यप्रदायक असे आहे.देवीच्या या रूपातून  देवीच्या अथांग करुणासागराचे  वात्सल्याचे  दर्शन होते.

'' सिंहासनगता नित्य पद्द्माश्रितकरव्दया !
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनीम्  '' !!

 '' वन्दे वाच्छित कामार्थे चन्द्रर्धकृतशेखराम् !
सिंहारूढा  चतुर्भुजा स्कंदमाता यशस्विनीम् !!

'' धवलवर्णा विशुद्ध चक्रस्थितो पन्चम् दुर्गा त्रिनेत्राम् !
अभय पद्म युग्मपुरां दक्षिण उरू पुत्रधराम् भजे !!

'' पटाम्बर परिधाना मृदहस्या नानालंकार भूषिताम् !
मज्जीर ,हार, केयूर किण्डकिणी रत्न कुंडल धारणीम् !!
.देवी -स्कंदमाता- नवरात्रीचां- पाचवा -दिवस-navratri-special.
स्कंदमाता..
स्कंद माते चा रंग पूर्णतः शुभ्र आहे. देवीने धवलवर्णीय वस्त्रे परिधान  केली आहेत.

'स्कंदमाता'ही कमळाच्या फुलावर विराजमान आहे . म्हणून देवीला पद्मासना असेही म्हणतात .देवीचे वाहन सिंहआहे. देवीला चार हात आहेत. म्हणून देवीला 'चतुर्भुजा धारणी' असे देखील म्हणतात.


स्कंदमता देवीने आपल्या उजव्या बाजूच्या खालील हातात कमळाचे फुल धारण केले आहे. तर डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा आहे.
देवीच्या मांडीवर  भगवान स्कंद,अर्थात भगवान कार्तिकेय विराजमान आहेत. 

भगवान स्कंदाची माता आहे ,म्हणून देवीला ''स्कंदमाता'' म्हणून ओळखले जाते.

जेव्हा तारका सुराने या पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. तेव्हा भगवान स्कंद म्हणजेच भगवान कार्तिकेय यांनी माता स्कंद मातेच्या प्रेरणा आणि शक्तीने तारकासुराचा वध करून देवतांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले ,आणि ते देवसेनापती या पदावर विराजमान झाले.



.देवी -स्कंदमाता- नवरात्रीचां- पाचवा -दिवस-

'' प्रफुल्ल वन्दना पल्लवाधरा कान्तकपोलाम् पीनपयोधराम् !
कमनीया लावण्याचारू त्रिवली नितम्बनीम् !!

''या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता  !
नमस्तस्येै नमस्तस्येै नमस्तस्यै नमो नमः !!

 '' या देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रुपेण संस्थिता  !
नमस्तस्येै नमस्तस्येै नमस्तस्येै नमो नमः !!
.देवी -स्कंदमाता- नवरात्रीचां- पाचवा -दिवस-navratri-special.
स्कंदमाता..



.देवी -स्कंदमाता- नवरात्रीचां- पाचवा -दिवस-navratri-special.
स्कंदमाता.
स्कंद माताची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. उपसकाच्या मनाचा विशुद्ध चक्रात प्रवेश होतो.

स्कंद मातेची आराधना करणाऱ्याची  चित्तवृत्ती लोप पावते, आणि तो सर्व संसारिक बंधनातून मुक्त होतो.

देवी स्कंदमाता ही सूर्य मंडळाची अधिष्ठात्री आहे त्यामुळे तिची पूजा अर्चना करणाऱ्याला भक्ताला असीम तेज प्राप्त होते.

त्याच्या जीवनातील सर्व हाल, अपेष्टा दुःख, नष्ट होऊन त्याला परम आनंदाची प्राप्ती होते. आणि तो या लोकी आणि परलोकी सुद्धा सुखाची प्राप्ती करतो.


.देवी -स्कंदमाता- नवरात्रीचां- पाचवा -दिवस-navratri-special.

देवी स्कंदमाते ची पूजा करणाऱ्याला भगवान स्कंद म्हणजेच भगवान कार्तिकेयच्या उपासनेची सुद्धा फल प्राप्ती होते.

देवी स्कंदमाता ही वात्सल्य, सुख समृद्धी यांची प्रति मूर्ती असल्याने तिची उपासना करणाऱ्याला मनोवांछित फळ प्राप्त होते.निपुत्रिकांना पुत्रप्राप्ती होते. धनाचा अभिलाषी असलेल्या धनप्राप्ती होते.

अशा या मातृ स्वरूपा स्कंदमाता देवी ला शत् शत् नमन.!


आजचा रंग;~ हिरवा.
आजची देवी:~ स्कंदमाता.







माता-शैलपुत्री- नवरात्रीचा - पहिला -दिवस- Navaraatri - Special. 


देवी-कात्यायनी- नवरात्रीचा- सहावा -दिवस- Navaratri-special .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या