नरक-चतुर्दशी- लक्ष्मी- कुबेर- पूजन -मुहूर्त-Narak-chaturdashi-Laxmi-pujan-Muhurt
शुभ दिपावली. |
दिवाळी:- ''आली आली ''दिवाळी आली ''मोती स्नानांची वेळ झाली '' असं म्हणत दिव्यांच्या लख्ख प्रकाशामध्ये साजरा केला जाणारा सण म्हणजे '' दिवाळी''.
वर्षातील सर्वात मोठा असलेला सण म्हणजे 'दिवाळी'. दिवाळी हा सण मांगल्याचा, चैतन्य पसरवणारा तुटलेली नाती परत जुळवून आणणारा असा हा सण आहे.
लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांचा आवडता सण म्हणजे' दिवाळी' कधी एकदा दिवाळी हा सण येतोय आणि आपल्याला फटाके उडवायला मिळतात याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात.
हिंदू परंपरेतील सणांपैकी सर्वात मोठा असणारा सण म्हणजे 'दिवाळी'.
या सणाची प्रत्येक जण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे उठून थंडगार वातावरणामध्ये अभ्यंगस्नान करण्याची मज्जा काही वेगळेच असते..! '' हो'' ना'..!
अधर्मावर धर्माचा विजय त्याचे प्रतीक म्हणून 'दिवाळी' हा सण साजरा केला जातो.
या सणांमध्ये पहाटे लवकर उठून अंगणाची साफसफाई करून सडा टाकून रांगोळी काढली जाते.
त्यानंतर अंगाला उठणे लावून अभ्यंगस्नान केले जाते.
अंगणामध्ये फटाके फोडून आतिशबाजी केली जाते. आणि फटाके म्हटले की ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाला आवडणार नाहीत '' नाही का'..!
दिवाळीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ खायला मिळत असतात.
करंजी, शंकरपाळी ,चकली आणि चिवडा हे मुलांचे फेवरेट पदार्थ.
प्रभू श्री रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास पूर्ण केल्या नंतर जेव्हा ते अयोध्येमध्ये आले, तेव्हां या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी अयोध्याकारांनी संपूर्ण अयोध्याला दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने सजवून काढले होते.
तेव्हांपासून हा दिव्यांचा उत्सव 'दीपोत्सव' म्हणजे दिवाळी साजरी केली जाते.
या दिवशी दिवे लावल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो असे मानले जाते.
शुभ-दिपावली- नरक-चतुर्दशी- लक्ष्मी- कुबेर- पूजन -मुहूर्त-Narak-chaturdashi-Laxmi-pujan-Muhurt
दिवाळी हा सण प्रामुख्याने चार किंवा पाच दिवसांचा असतो. त्यामध्ये प्रत्येक दिवशी एक नवीन परंपरा जोपासण्याची शिकवण दिली जाते.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे 'वसुबारस' या दिवशी गाय आणि तिच्या मायेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
या दिवशी गाईला आंघोळ घालून तिची पूजा केली जाते आणि तिला गोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात.
दुसरा दिवस' धनत्रयोदशी ' या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करून त्यांच्याकडे परिवारातल्या सर्व लोकांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली जाते.
तिसरा दिवस ' नरक चतुर्दशी ' या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याच्या अत्याचारापासून या पृथ्वीला मुक्त केले होते असे मानले जाते.
या दिवशी नरकाची देवता म्हणजेच यमदेवता यांचेही पूजन केले जाते.
चौथा दिवस म्हणजे 'लक्ष्मी ' आणि 'कुबेर' पूजन. त्यादिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करून घरामध्ये सुख- समृद्धी, ऐश्वर्य नांदावे अशी प्रार्थना केली जाते.
त्यानंतर दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस म्हणजे 'बलिप्रतिपदा( पाडवा) आणि भाऊबीज.
त्यादिवशी बळीच राज्य येऊ दे अशी प्रार्थना केली जाते तसेच बहिण -भाऊ यांच्यामधील प्रेम आणि आणि त्यांचे अतूट नाते दर्शवणारा दिवस म्हणजे 'भाऊबीज'.
शुभ-दिपावली- नरक-चतुर्दशी- लक्ष्मी- कुबेर- पूजन -मुहूर्त-
नरक चतुर्दशी ;- अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी म्हणजेच 'नरक चतुर्दशी'. या दिवसाला 'नरक चौदास', 'रूप चतुर्दशी' तसेच 'छोटी दिवाळी' असेही म्हटले जाते.
दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे 'नरक चतुर्दशी'. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते.
या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या पूजेचे फळ प्राप्त होते असे मानले जाते.
या दिवशी पहाटे लवकर उठून अंगाला हळद किंवा उठणे लावून अभ्यंग स्नान केले जाते . त्यानंतर अंगणामध्ये दिवे लावले जातात.
अंगणात दिवे लावल्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो असे मानले जाते.
या दिवशी संध्याकाळी अंगणामध्ये दक्षिण बाजूस एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावल्यास अकाल मृत्यूपासून रक्षा होते असे मानले जाते.
या दिवशी यमदेवतेची देखील पूजा केली जाते. यमदेवतेला नरकाचे स्वामी मानले जाते.
या दिवशी यमदेवतेच्या नावानेही अंगणात दिवा लावतात म्हणून या दिवसाला 'यमतर्पण' दिवस असेही म्हणतात.
असे केल्याने सर्व प्रकारच्या भयां पासून आपले रक्षण होते.
दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशी
या दिवशी गायीची पूजा करून गाईला हिरवा चारा खाऊ घातल्यास, आपल्याला 'तेहत्तीस कोटी' देवतेंचे आशीर्वाद प्राप्त होतात.
तसेच भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो.
या दिवशी संध्याकाळी जर आपण पितरांच्या नावांचा एखादा दिवा लावला तर आपले पूर्वज आपल्यावर खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतात.
त्यामुळे आपली अडकलेली कामे पुन्हा सुरू होतात, तसेच आपल्या नवीन कामांमध्ये कोणताही अडथळा येत नाही.
या दिवशी दीपदान तसेच अन्नदान केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
या दिवशी देवी "महाकाली" ची देखील पूजा केली जाते.
देवी काली ही दृष्ट शक्तींचा नाश करणारी आणि आपल्या भक्तांचे कल्याण करणारी देवी आहे.
तिची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या भयां पासून मुक्ती मिळते. या दिवशी देवी 'काली' ची पूजा केली जाते म्हणून या दिवसाला "काली चौदस "असे म्हटले जाते.
शुभ-दिपावली- नरक-चतुर्दशी- लक्ष्मी- कुबेर- पूजन -मुहूर्त-Narak-chaturdashi-Laxmi-pujan-Muhurt
जेव्हां भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून पृथ्वीला समुद्रतळातून आणून तिची पुन्हा स्थापना केली .
तेव्हां पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला. देवी सीतेचे वडील महाराज जनक यांनी नरकासुराचे पालण- पोषण केले.
नरकासुर जेव्हा सोळा वर्षाचा झाला तेव्हा देवी पृथ्वी त्याला घेऊन वैकुंठात गेली. तेव्हा 'भगवान विष्णूंनी ' नरकासुराला प्राग्यज्योतिषपूर हे राज्य देऊन त्याला त्या राज्याचा कार्यभार सांभाळण्यास सांगितलेे.
भगवान श्री विष्णूंनी नरकासुराला' दुभेथ रथ' प्रदान केला.
नरकासुराचा विवाह विदर्भाची राजकन्या '' माया'' हिच्याशी झाला.
नरकासुराने काही काळ आपले राज्य सुरळीतपणे चालवले त्यानंतर नरकासुराची मैत्री मथुरेचा राजा कंस याच्याशी झाली.
हळूहळू नरकासुराच्या व्यवहारामध्ये बदल होत गेला.
पण जेव्हां त्याची मैत्री बाणासुर शी झाली तेव्हा मात्र 'नरकासुर' संपूर्ण राक्षस वृत्तीचा बनला. बाणासुर महादेवांचा महान भक्त होता. पण तो अत्यंत कपटी आणि धूर्त स्वभावाचा राक्षस होता.
बाणा सुराच्या संगतीमध्ये राहून नरकासुराने ऋषीमुनी ,लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली.
'नरकासुराने उच्छाद मांडला. तो प्रतिदिन ऋषीमुनींचे यज्ञ भंग करत सुटला . कित्येक स्त्रियांना त्याने बंदीवासात टाकले.
एकदा नरकासुराने ऋषी वशिष्ठ यांचा यज्ञ भंग केला असता ऋषी वशिष्ठ यांनी नरकासुराला तुझा मृत्यू भगवान विष्णूंच्या हातूनच होईल असा श्राप दिला.
या श्रापा पासून वाचण्यासाठी नरकासुराने ब्रह्मदेवांची कठोर तपस्या केली.
जेव्हा ब्रह्मदेव नरकासुराच्या कठोर तपस्येने त्याच्यावर प्रसन्न झाले.
तेव्हा नरकासुराने ब्रह्मदेवांकडे त्याचा वध कोणाच्याही हातून होऊ नये असा वर मागितला.
ब्रह्मदेवांनी नरकासुराला तसा वर दिला. हा वर प्राप्त झाल्यानंतर नरकासुराच्या आत्याचार अजूनच वाढले.
त्याने या सृष्टीवरील सर्व राजांवर आक्रमण करून त्यांना बंदी केले आणि त्यांच्या बायका- मुलींवर अत्याचार केले.
नरकासुराने या पृथ्वीवरील जवळपास 16101 स्त्रियांना बंदी करून त्यांना आपले दास केले.
त्यांने राजांची सर्व संपत्ती लुटली कित्येक ऋषींची हत्या केली.
देव माता अदितीची दिव्य कुंडले ,वरूण देवांचे विशाल छत्र हिरावून नेले .
नरका सुराला मिळालेल्या अजय वरदाना मुळे कोणीच त्याचे काहीही वाकडे करू शकत नव्हते.
नरकासुराच्या आईने म्हणजे पृथ्वीने त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला पण नरकासुराने त्यांचे काहीही ऐकले नाही.
नरकासुर. |
नरकासुराने मनी पर्वतावर एक विशाल काय नगर बसवून त्यामध्ये 16,101 स्त्रियांना त्यावर नेऊन बंदीवासात टाकले.
हे नगर सर्व बाजूंनी अग्नी ,पाणी, तसेच मोठ मोठे दुर्ग आणि शस्त्राअस्त्रांनी वेढलेले होते. अशा या अभेद्य नगरामध्ये प्रवेश करून नरकासुराचा वध करणार कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला.
तेव्हा सर्व ऋषीमुनी, देवता मिळून भगवान श्रीकृष्णांना शरण गेले.
तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भक्तांच्या रक्षणासाठी गरुडावर बसून नरकासुरावर आक्रमण केले.
श्रीकृष्णांनी नरकासुराच्या अभेद्य दुर्गाचा आपल्या सुदर्शन चक्राने एका क्षणात विध्वंस केला.
त्यानंतर श्रीकृष्णांनी नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करून त्याचा वध केला. आणि या सृष्टीला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले.
त्याच्या बंदीवासात असलेल्या 16101 स्त्रियांना मुक्त केले.
शुभ-दिपावली- नरक-चतुर्दशी- लक्ष्मी- कुबेर- पूजन -मुहूर्त-Narak-chaturdashi-Laxmi-pujan-Muhurt
पण त्यानंतर एक वेगळीच समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली.
नरकासुराने बंदी केलेल्या 16101 मुलींचा स्वीकार कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला.
तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सर्वच्या सर्व 16101 स्त्रियांचा स्वतःची पत्नी म्हणून स्वीकार केला.
आणि त्यांच्यासोबत विवाह करून त्यांचा मान वाढवला.
जेव्हा श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला, तेव्हा नरकासुराच्या रक्ताचे शिंतोडे हे श्रीकृष्णांच्या अंगावर पडले होते.
भगवान श्रीकृष्णांनी हेच रक्त साफ करण्यासाठी हळद आणि तेल लावून आंघोळ केली. आणि म्हणून तेव्हापासून नरक चतुर्थी दिवशी अभ्यंग स्नान केले जाते.
शुभ-दिपावली- नरक-चतुर्दशी- लक्ष्मी- कुबेर- पूजन -मुहूर्त-Narak-chaturdashi-Laxmi-pujan-Muhurt
लक्ष्मी व कुबेर पूजन:- यावेळेस नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आले आहे.
ज्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. आणि म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते.
असे म्हणतात की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी ही प्रत्येक घरी जाऊन घराची पाहणी करत असते.
ज्यां घरामध्ये साफसफाई केलेली असते, ज्या घरी मोठ्यांचा आदर केला जातो, अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी सदैव वास करते.
त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई केली जाते. तसेच संध्याकाळच्या वेळी पुन्हा एकदा साफसफाई केली जाते.
तसेच घराच्या अंगणांमध्ये दिवे लावून तुळशीपाशी हि दिवा लावला जातो.
त्यानंतर घरातील देव्हाऱ्यामध्ये देवी लक्ष्मीची पूजा मांडून मनोभावे सेवा केली जाते. त्यानंतर देवीला गोडाचा निवेद्य म्हणजे साखर किंवा शिरा अर्पण केला जातो .
आणि तिची कृपादृष्टी आपल्या घरावर सदैव राहावी यासाठी प्रार्थना केली जाते.
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.......!
लक्ष्मी व कुबेर पूजन मुहूर्त;-सकाळी 6:37ते 7:54,,
9:31ते 10:47, पर्यंत. त्यानंतर दुपारी 3:18 ते 6:01 पर्यंत..
रात्री 7:01 ते 8:30. आपल्या सोयीनुसार.
0 टिप्पण्या
हि वेबसाईट कोणतीही त्रुटी पूर्ण टिप्पणी स्वीकारत नाहीत.य़ाची कु्पया नोंद घ्यावी.