अंगारक -संकष्टी -चतुर्थी - व्रत -कथा-angarak-sankshthi-chaturthi-Katha-in-marathi.

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कथा;-

  आज अंगारकी चतुर्थी हिंदू परंपरेतील महत्त्वाच्या व्रतांपैकी एक व्रत या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थी दिवशी केले जाते मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी असे म्हणतात आणि इतर दिवशी येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात असे का ? चला जाणून घेऊया.

अंगारकी चतुर्थी
अंगारकी गणेश चतुर्थी

 हिंदू शास्त्र धर्मग्रंथाप्रमाणे आजचे व्रत करणाऱ्याला धनसंपत्ती ऐश्वर्य आणि सुख शांती प्राप्त होऊन त्याच्या पुण्यांमध्ये वृद्धी होते.


अंगारक संकष्टी चतुर्थी व्रत कथा:~         

  !!वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ!निर्विघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा!!

   अंगारकी चतुर्थीचे जो कोणी भक्तिभावाने व्रत करतो त्याच्या  सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्यांना भगवान गणेशाची  विघ्नहर्ता गणेशाची विशेष कृपा प्राप्त होऊन त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात चला तर मग जाणून घेऊया  या व्रता मागची कथा.
अंगारकी चतुर्थी
अंगारक संकष्टी चतुर्थी

  गणेश पुराणात वर्णित कथेनुसार भारद्वाज नावाचे ऋषी होते ते महान गणेश भक्त होते ते अत्यंत तेजस्वी आणि मोठे तपस्वी होते त्यांच्या तपोबलाची ख्याती सर्वत्र पसरली होती.
  ऋषी भारद्वाज एके दिवशी नदीवर स्नान करण्यासाठी गेले असता त्यांना नदीवर एक अप्सरा जलक्रीडा करत असलेली दिसली
ऋषी भारद्वाज

तिला पाहून ऋषीवर तिच्यावर मोहित झाले त्यामुळे ऋषींचे तेज द्रविभूत होऊन पृथ्वीवर पडले.
 ऋषी भारद्वाज आणि अप्सरा.

पृथ्वीने ते तेज ग्रहण केले ,त्या तेजापासून पृथ्वीला एक मुलगा झाला तो मुलगा जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंगाचा होता
  हा मुलगा सात वर्षाचा झाल्यानंतर पृथ्वीने तो भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केला. ऋषींनी त्याचे नाव उपनयन असे ठेवले त्याला आपले संपूर्ण ज्ञान देऊन वेद  शिकवले आणि त्याला गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले.

अंगारक चतुर्थी व्रत कथा:-


  हा मुलगा उपवानात येऊन घोर तपस्या करू लागला त्याच्या या घोर तपश्चर्यने भगवान गणेश त्याच्यावर प्रसन्न झाले.
अंगारक चतुर्थी
अंगारक संकष्टी चतुर्थी
  श्री गणेशांनी त्याला मनोवांचित वर मागण्यास सांगितले. स्वर्गात जाऊन अमृत प्राशन करण्याची माझी इच्छा आहे आणि माझे नाव सर्व दूर पसरावे अशी माझी अपेक्षा आहे असे तो मुलगा म्हणाला.
  श्री गणेश त्याला म्हणालेे मी तुझ्या तपश्चर्याने अत्यंत प्रसन्न झालो आहे मी तुला तुझ्या लाल वर्णामुळे अंगारक असे नाव देतो आणि आशीर्वाद देतो की आजची चतुर्थी तुझ्याच नावाने म्हणजे 'अंगारकी चतुर्थी' या नावाने ओळखली जाईल तुला मंगल या नावाने देखील ओळखले जाईल आणि मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी चतुर्थीच्या नावाने सर्व  दूर ओळखली जाईल तुझे नाव सर्व दूर ओळखले जाईल आणि अशाप्रकारे तुझे नाव सर्वत्र विख्यात होईल.
  तुला ग्रहांमध्ये एक विशेष स्थान प्राप्त होऊन तुला देवांसोबत अमृत ग्रहण करता येईल आणि तुला मंगळ ग्रह या नावाने सर्वजण ओळखतील. जो कोणी मनुष्य या दिवशी म्हणजे ''अंगारकी चतुर्थी ''दिवशीच हे व्रत करेल त्याला 21 चतुर्थ्यांचे फल प्राप्त होईल आणि तो ऋणमुक्त होईल आणि त्याच्या पुण्यांमध्ये सुद्धा वृद्धी होईल असा आशीर्वाद देऊन भगवान श्री गणेश आंर्तध्यान झाले.
तो मुलगा म्हणजेच मंगळ देव मंगळ ग्रह..

अंगारकी चतुर्थी व्रत श्लोक आणि पूजा :

 अंगारकी चतुर्थी  या दिवशी व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून गणपतीच्या फोटोची किंवा मूर्तीची विधिवत पूजा करून दूर्वा आणि लाल पुष्प किंवा जास्वंदीचे पुष्प गणपतीला अर्पण करावे त्यानंतर आरती करून 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर दिवसभर उपवास करावा संध्याकाळी धूप दिवा लावून गणपतीची आरती करावी आणि चंद्रोदय झाल्यानंतर हा श्लोक म्हणून स्वतः भोजन करावे.
श्लोक:~  !!श्री गणेशाय नमस्तुभ्य्ं सर्व सिद्धी प्रदायकं संकष्ट हरमे देवं गृहणार्ध्यम् नमोस्तुते! कृष्णपक्षे चतुर्थ्यातु संम्पुजिंत् विधूदये! क्षिप्रं प्रसिद देवेश् अंगारकाय नमोस्तुते!!

आजचा चंद्रोदय:~ रात्री 8:48 मिनिटांनी...!









 
   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या