विराट -कोहलीचा -वन -मॅन -आर्मी -शो -भारताचा -पाकिस्तानवर -चार- गडी -राखून- दणदणीत -विजय-India-vs-pakistan-match-t20-world-cup-
भारत- पाकिस्तान मॅच म्हटलं की सर्वांच्याच चर्चेचा विषय. कधी एकदा हा सामना सुरू होतो आणि कधी एकदा टीव्हीसमोर बसतोय असे सगळ्यांनाच होत असते.
शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यामध्ये रोमांच खचखचून भरलेले असते.
प्रत्येक चेंडूच्या वेगाप्रमाणे प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके हे कमी- जास्त होत असतात.
सर्वात लोकप्रिय क्रिकेट खेळातील सर्वात मोठे प्रतिव्दंदि म्हणून भारत -पाकिस्तान यां सघांची ओळख आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय सामने होत नाहीत.
मात्र मोठ्या टूर्नामेंट मध्ये जसे की एशिया कप, टी ट्वेंटी वर्ल्ड कप ,50 षटकीय वर्ल्ड कप.. यामध्ये भारत पाकिस्तान मॅचचा रोमांच सर्वांनाच पाहायला मिळत असतो.
दोन्ही देश एकमेकांचे कट्टर प्रतिव्दंदी संघ मानले जातात. या हाय व्होल्टेज सामन्यांमध्ये दोन्ही संघावर मोठ्या प्रमाणात प्रेशर असते.
विराट -कोहलीचा -वन -मॅन -आर्मी -शो -भारताचा -पाकिस्तानवर -चार- गडी -राखून- दणदणीत -विजय-India-vs-pakistan-match-t20-world-cup-
'भारत- पाकिस्तान' यांच्या दरम्यान असाच एक हाय वोल्टेज सामना काल ऑस्ट्रेलियाच्या एम,सी,जी स्टेडियम वर खेळण्यात आला .
आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2022 च्या सुपर 12 फेरीचा हा दुसरा सामना होता.
अवघ्या देशाचं लक्ष लागले लागलं होतं ते या सामन्याच्या ' 'नाणे फेकीकडे' कारण म्हटलं जातं ना '' टॉस विन मोस्ट विन मॅचेस''.
आणि टॉस झाला...!
आणि टॉस भारतीय कर्णधार रोहित शर्मा ने जिंकला. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कारण प्रेशर मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं सोयीस्कर असतं.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.
भारतीय गोलंदाजानी उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करून, पाकिस्तानी धावसंख्येचा वेग रोखून धरला.
पाकिस्तान संघाच्या अंतरा-अतरा विकेट्स पडत होत्या पण एका बाजूने पाकिस्तानी फलंदाज ' शान मसूद' याने आपली विकेट सांभाळत फटके भजी करत होता.
त्याला' इफ्त्तीखार अहमद' याची चांगली साथ मिळाली दोघांनी मिळून पाकिस्तानी संघाला 159/8 अशा सन्मान जनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
दरम्यान शान मसुद ने 52*(42) तर 'इफ्तिखार अहमद. '
याने 51(34़) अशी धावसंख्या केली.तसेच शाहीन आफ्रिदी ने 16(8) एवढी धावसंख्या केली.
तत्पूर्वी भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने आणि औषधीप सिंगने प्रत्येका 3-3 तीन बळी घेतले. तर भुनेश्वर कुमार ने 1 बळी घेतला.
विराट -कोहलीचा -वन -मॅन -आर्मी -शो -भारताचा -पाकिस्तानवर -चार- गडी -राखून- दणदणीत -विजय-India-vs-pakistan-match-t20-world-cup-
भारताची फलंदाजी पाहता 160 रनांचे लक्ष फार काही विशाल नव्हते.
पण म्हणतात ना..! की प्रेशर मॅच मध्ये कोणतेच लक्ष छोटे नसते. आणि झाले ही तसेच.
'160' धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात ही चांगली झाली नाही.
अवघी 7 धावसंख्या असताना के एल राहुल चेंडूला डिफेन्स करण्याच्या नादात आपली विकेट देऊन बसला.
त्याच्यापाठोपाठ कर्णधार रोहित शर्मा आहे फारसे काही करू शकला नाही.
आणि रोहित शर्मा 4(7) एवढी धावसंख्या करून तंबूत परतला.
आता भारतीय संघाची स्थिती 10/2 दोन विकेट्स अशी झाली.
त्यानंतर सूर्यकुमार यादव देखील लवकरच म्हणजे15(10) अशी धावसंख्या करून माघारी परतला.
सूर्य कुमारच्या विकेट नंतर भारतीय 26 /3 अशी बिकट अवस्था झाली.
मात्र दुसऱ्या बाजूने भारतीय संघाचा माजी कर्णधार ''विराट कोहली'' हा संघासाठी एखाद्या देवदूताप्रमाणे उभा राहिला.
विराट कोहली |
तिने एका बाजूने आपली विकेट सांभाळत भारतीय धावसंख्येला गती दिली.
या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या फलंदाजी बद्दल प्रश्नचिन्ह उभे केले जात होते.
समाज माध्यमातून तसेच क्रिकेट विश्लेषकांकडून '' तो फॉर्म मध्ये नाही '' 'विराट कोहली चे स्थान आता टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये उरले नाही अशी टीका केली जात होती.
''पण म्हणतात ना' की 'अनुभव बाजारात विकत मिळत नाही तो कमवावा लागतो ''.
याचे मूर्तिमंत उदाहरण प्रस्तुत करत विराट कोहलीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
विराट कोहलीने आपल्या अविश्वसनीय खेळीच्या माध्यमातून त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
विराट कोहली जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा भारतीय संघाची स्थिती 10/2 अशी होती.
विराट कोहलीने आपल्या अनुभवाचा परिचय देत संघाला टफ् सिच्युएशन मधून बाहेर काढत विजय मिळवून दिला.
त्यांनी सुरुवातीला सावकाश धावसंख्या काढत धावपट्टीचा अंदाज घेतला आणि नंतर तुफान फटकेबाजी केली.
विराट -कोहलीचा -वन -मॅन -आर्मी -शो -भारताचा -पाकिस्तानवर -चार- गडी -राखून- दणदणीत -विजय-India-vs-pakistan-match-t20-world-cup-
यादरम्यान विराट कोहलीने नाराज 82*(53) अशी धावसंख्या केली.
विराट कोहलीच्या धावसंख्येच्या बळावर भारतीय संघाने 160/6 (20)असे लक्ष पार केले.
दुसऱ्या बाजूने हार्दिक पांड्यानेही विराट कोहलीला चांगली साथ दिली, ज्याने 40(37) अशी धावसंख्या करत या विजयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विराट कोहलीच्या तुफान अर्धशतकीय खेळीच्या बळावर भारतीय संघाने पाकिस्तान वर 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
आणि मागच्या वर्ल्ड कप मध्ये झालेल्या पराभवाचा हिशोब बरोबर केला.
दरम्यान पाकिस्तानी संघाकडून ' हँरीस रउफ' आणि' मोहम्मद नवाज' यांनी प्रत्येकी 2~2 बळी घेतले.तर' नसीम शहा' याने 1 बळी घेतला.
भारतीय संघाने आपल्या चाहत्यांना पाकिस्तानवर विजय मिळवून दिवाळीचे गिफ्ट दिले आहे .
भारतीय संघाचा सुपर 12 फेरी मधील दुसरा सामना हा 27 ऑक्टोबर रोजी नेदरलँड बरोबर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक;~ भारत:- रोहित शर्मा 4(7),के.एल.राहुल 4(8), विराट कोहली 82*(53), सूर्यकुमार यादव 15(10),अक्षर पटेल 2(3़), हार्दिक पांड्या 40(37), दिनेश कार्तिक 1(2).
पाकिस्तानी गोलंदाजी:~ haris rauf 2/36 (4),Mohammad nawaz 2/42 (4),naseem shah 1/23(4).
पाकिस्तान:~ shan masood 52*(42),Iftikhar Ahemad 51(34), shaheen afridi 16(8).
भारतीय गोलंदाजी:~ हार्दिक पांड्या 3/20(4),अर्षदीप सिंग 3/32(4) भुवनेश्वर कुमार 1/22(4)
भारतVs नेदरलँड .27 ऑक्टोबर 2022.
start;at 12:30pm
हे वाचा:~
0 टिप्पण्या
हि वेबसाईट कोणतीही त्रुटी पूर्ण टिप्पणी स्वीकारत नाहीत.य़ाची कु्पया नोंद घ्यावी.