धनत्रयोदशी-धन्वंतरी-जयंती-दिवाळीचा- दुसरा -दिवस-Dhanteras-Dhanwantari-jayanti
आज अश्विन कृष्ण त्रयोदशी....! म्हणजेच "धनत्रयोदशी".
आजच्या दिवशी धनाची म्हणजेच देवी लक्ष्मीची पुजा केली जाते.
आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने पुढील वर्षभर घरात सुख-समाधान नांदते.
तसेच पुढील वर्षभर आपल्या कोणत्याही कामांमध्ये कसलाही अडथळा येत नाही.
तसेच या दिवशी स्त्रिया नवीन सोन्या - चांदीच्या दागिन्यांची खरेदी करून त्यांची पूजा करतात.
यावेळेस धनत्रयोदशी ही दोन वेगवेगळ्या दिवशी आली आहे.
शनिवार 22 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशी तिथीला संध्याकाळी 4 वाजुन 23 मिनिटांन पासुन सुरूवात होत असून ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबंर 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजून 03 मिनीटांपर्यंत असणार आहे.
यावेळेस धनत्रयोदशी ही उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रात आली असून या नक्षत्राचे शासक' सूर्यदेव' आहेत.
त्यामुळे आजच्या दिवशी सूर्याला देणार पण केल्याने किंवा सूर्य देवांची पूजा केल्यास, आपल्याला सूर्य देवांची देखील कृपा प्राप्त होणार आहे.
तिथीनुसार धनत्रयोदशी ही उद्या म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी असली तरी त्याचे मूल्य आज म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी च आहे.
म्हणून 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर अशा दोन्ही दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
धनत्रयोदशी-धन्वंतरी-जयंती-दिवाळीचा- दुसरा -दिवस-
'' धनत्रयोदशी '' दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेरांची मनोभावे विधी युक्त पूजा केल्यास,आपल्याला धन- संपत्ती, कीर्ती, वैभव, आणि आरोग्याची प्राप्ती होऊन पुढील संपूर्ण वर्ष हे सुख- समाधान चे जाते अशी मान्यता आहे.
'धनत्रयोदशी' या दिवसाला व्यवसायिक वर्गात विशेष महत्त्व असते.
आजच्या दिवशी व्यवसायिक लोक आपल्या व्यवसाय ठिकाणाची साफसफाई करून देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विधीवत पूजा करतात.
आणि देवी लक्ष्मीला त्यांच्या व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये भरभराट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करतात.
काही व्यापारी लोक हे आजच्या दिवसापासून म्हणजेच ''धनत्रयोदशी '' पासून आपला व्यवसायिक हिशोब नवीन वहीमध्ये मांडण्यास सुरू करतात.
आजच्या दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती असे मानले जाते म्हणून आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
आजच्या दिवशी धन्वंतरी देवतेची ही पूजा केली जाते.
धनत्रयोदशी-धन्वंतरी-जयंती-दिवाळीचा- दुसरा -दिवस-Dhanteras-Dhanwantari-jayanti
हेमा नावाचा एक महापराक्रमी राजा होता.
त्या राजाला एकुलता एक पुत्र होता. एके दिवशी राज्याच्या दरबारात मोठे तपस्वी ऋषी आले असताना राजाने आपल्या मुलाच्या भविष्याची विचारणा केली.
तेव्हा त्या ऋषींनी तुझ्या पुत्राचा वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्यू होईल अशी भविष्यवाणी केली.
ती भविष्यवाणी ऐकल्यापासून राजा काळजीत पडला. आपल्या मुलाच्या अल्पआयुच्या चिंतेने त्याच मन त्रस्त झाले.
राजाने आपल्या मुलाला जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी त्याचे कमी वयातच लग्न एका राजकन्येशी लावून दिले.
अशातच सोळा वर्ष पूर्ण झाली. लग्नाचा चौथा दिवस, तो राजकुमाराच्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता.
त्यादिवशी रात्री राजकुमार च्या पत्नीने राजकुमाराला रात्रभर जागवत ठेवले.
राजकुमारच्या अवतीभोवती सोन्या-चांदिच्या मोहरा, ठेवल्या.सोन्यांच्या नाण्यांनी भरलेले हंडे ठेवले
कक्षाचा दरवाजा हा सोन्याने भरलेल्या हंड्यांनी बंद केला..
जेव्हां मृत्यू देवता 'यम देव 'सर्प रुपाने राजकुमाराचे प्राण हरण्यासाठी आले तेव्हां सोन्या - चांदीकडे पाहून यमदेवांचे डोळे दिपले आणि ते राजकुमाराचे प्राण न घेताच यमलोकात परत गेले.
अशाप्रकारे राजकुमाराचे प्राण या दिवशी वाचले अशी कथा आहे.
म्हणून धनत्रयोदशी च्या दिवसाला "'यमदीपदान "दिवस' असेही म्हटले जाते.
तसेच या दिवशी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पूजा देखील केली जाते.
आजच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्या दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला केले जाते.
असे केल्याने अकाल मृत्यूपासून रक्षण होते असे मानले जाते.
आजच्या दिवशी केली जाते धन्वंतरीची पूजा..
आजच्या दिवशी म्हणजेच 'धनत्रयोदशी' दिवशी 'धन्वंतरी जयंती 'देखील आहे.
धन्वंतरी देव हे आरोग्याचे प्रतीक मानले जातात त्यामुळे धन्वंतरी देवांची पूजा केल्याने आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते असे मानले जाते.
जगत पालक भगवान विष्णूंच्या 24 अवतारंपैकी 'धन्वंतरी' हा भगवान विष्णूंचा बारावा अवतार मानला जातो.
जेव्हा देवता आणि असुर यांनी मिळून अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले होते तेव्हा धन्वंतरी देव हे समुद्रमंथनातून प्रकट झाले होते त्यांच्या एका हातात अमृत कलश होता.
" ॐ नमो भगवते वासुदेवाय !
धन्वंतरी स्वरूपाय नमः !!
'' ॐ तत्पुरुषाय विद्महें अमृतकलशा हस्ताय धीमही !
तन्नो धन्वंतरी प्रचोदयात '' !!
'धन्वंतरी' देवतेला चार हात असून त्यांनी आपल्या चार हातात अनुक्रमे 'आयुर्वेदिक ग्रंथ' ,'अमृत कलश','औषधी वनस्पती', 'शंख' धारण केले आहे.
धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्याला सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते तसेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वृद्धी होते.
आपल्याला कधीच कोणत्याही प्रकारच्या आजाराची लागण होत नाही.
सर्वांना "धनत्रयोदशी "आणि "धन्वंतरी जयंती"च्या हार्दिक शुभेच्छा..!
0 टिप्पण्या
हि वेबसाईट कोणतीही त्रुटी पूर्ण टिप्पणी स्वीकारत नाहीत.य़ाची कु्पया नोंद घ्यावी.