वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस-Diwali-first-day-Diwali-special


वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special



  आज 'वसुबारस'..! दिवाळीचा पहिला दिवस..!
वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special
वसुबारस.



हिंदू परंपरेतील महत्त्वाच्या सणांपैकी मानल्या जाणाऱ्या दिवाळीला आज पासून म्हणजेच वसुबारशी पासून सुरुवात होत असते.

आजच्या दिवसाला हिंदू शास्त्रात खूप महत्त्व आहे. आजच्या दिवशी म्हणजेच वसुबारसे दिवशी गो माता अर्थात गाईची पूजा केली जाते.

गाय ही  माता कामधेनुची स्वरूप मानली जाते. गोमाता ही सर्व इच्छा पूर्ण करणारी मानली जाते.

तिची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

गोवत्स द्वादशी तसेच अश्विन कृष्ण द्वादस म्हणजेच 'वसुबारस' म्हणूनही ओळखली जाते.



वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन ,त्यामुळे वसुची पूजा केल्याने आपल्याला धनसंपत्ती आणि आरोग्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे.


दिवाळीचा पहिला दिवस 'वसुबारस' त्यानंतर दुसरा दिवस धनत्रयोदशी त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मी व कुबेर पूजन, दिवाळी पाडवा, आणि शेवटी भाऊबीज अशाप्रकारे दिवाळी साजरी केली जाते .


आजच्या दिवशी गाईला व तिच्या वासराच्या अंगाला हळद लावली जाते.

त्यानंतर गाईला व वासराला स्वच्छ पाण्याने अंघोळ घातली जाते.
वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special
वसुबारस


नंतर गायीला व तिच्या वासराला हळद कुंकू लावून त्या दोघांची पूजा केली जाते. या दिवशी गाईला पुरणपोळी किंवा कोणताही गोडाचा पदार्थ करून नैवेद्यच्या स्वरूपात  दाखवला जातो.



वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special

गाय ही माया, प्रेम आणि वात्सल्याची प्रतीक असते. तिची पूजा केल्याने घरात धन -धान्य संपत्ती, सुख-शांती नांदते तसेच आरोग्याचीही प्राप्ती होते.

आजच्या दिवशी घरातील स्त्रिया हा उपवास करतात त्यानंतर घरातील देवांची आणि नंतर  गायीची पूजा करतात.
वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special
वसुबारस.
''वसुबारस ''


त्यानंतर गोडाचे पदार्थ करतात. 

 संध्याकाळी गायीची पुन्हा एकदा पूजा करून केलेले गोडाचे पदार्थ गाईला खाऊ घालतात.

या दिवशी स्त्रिया या गवारीच्या शेंगांची भाजी करून आपला उपवास सोडतात.

जेव्हां देवता आणि राक्षसांनी मिळून समुद्रमंथन केले होते त्यावेळेस समुद्रमंथनातून पाच कामधेनु प्रकट झाल्या.

त्या पाच कामधेंनुपैकी ' नंदा' नावाच्या कामधेनूची वसुबार्शी दिवशी पूजा केली जाते अशी कथा आहे.


असे मानले जाते की आजच्या दिवशी गाईची पूजा केल्यास भगवान श्रीकृष्णांची अपार कृपा प्राप्त होते.
वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special






वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special


भगवान श्रीकृष्णांना 'गाय 'अत्यंत प्रिय आहे. गाईची सेवा केल्याने भगवान श्रीकृष्ण आपल्यावर अति प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special
वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special


यामागे मनाला स्पर्श करून जाणारी अशी एक कथा आहे.
वृंदावन गोकुळात असताना भगवान श्रीकृष्ण नित्य नेमाने गाईंना चरण्यासाठी वनात घेऊन जात असत.

एके दिवशी श्रीकृष्णांनी पाहिलं की काही लोक आणि  मोठी मुले ही गाईला त्रास देत होती.


गाय ते सगळं निमूटपणे सहन करत होती.

त्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्या गाईजवळ गेले आणि त्यांनी गाईला विचारले .

'' मी  तुला तुझे स्वतःचे रक्षण करण्यासाठी ही दोन शिंगे दिली आहेत' मग तू मघाशी ते लोक तुला त्रास देत असताना त्यांना तू आपल्या ह्या शिंगांनी  का मारले नाहीस'' ?


 '' का सगळं निमूटपणे सहन करत राहिलीस '?

यावर गाईने शांतपणे उत्तर दिले .

'' प्रभु '' जशी आई ' आपल्या लेकरांनी तिला कितीही जरी त्रास दिला तरी ती त्यांचा राग  कधीच मनात धरत नाही आणि त्यांच्यावर माया करतच राहते..''

'' त्याप्रमाणे मीही या सर्वांना स्वतःची लेकरेच समजते''.
हे सर्वजण प्रतिदिन माझे दूध काढतात ते जरी मला त्यांची आई समजत नसले तरीही मी मात्र त्यांना माझे पुत्रच समजते'' 

'' आता तुम्हीच सांगा 'प्रभू ' एक आई आपल्या लेकरांना कशी काय मारू शकते ,म्हणून मी त्यांना मारले नाही.

यावर भगवान श्रीकृष्णांच्या डोळ्यात अश्रू आले.
वसुबारस- दिवाळीचा -पहिला -दिवस- Diwali-special
श्रीकृष्ण आणि गोमाता.


 आणि भगवान श्रीकृष्णांनी तक्षणी गाईला आशीर्वाद दिला की...!

''मी तुला आशीर्वाद देतो,'मी कुठल्याही लोकात असलो तरी तू हाक देता मी तुझ्या रक्षणासाठी तसाच धावत येईन' आणि जो कोणी मनुष्य तुझी पूजा करेल तो 'माझ्या' कृपेस पात्र असेल''.




सर्वांना वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

















                       <<<आणखी वाचा>>>







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या