माझा -आवडता -संत- ज्ञानेश्वर-Maza-Avadata-Sant-Nyaneshwar-best-in-Marathi.
मित्रांनो आजपासून आपण ''माझा आवडता संत'' या निबंध माले अंतर्गत महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महान संतांची माहिती पाहणार आहोत.
त्यांनी केलेल्या त्यागाची लोकल्यांणासाठी केलेल्या अथक परिश्रमांची माहिती करून घेणार आहेत.
'त्यांनी' या जगाच्या उद्धारासाठी केलेल्या कार्यांचा आढावा घणार आहोत.
परमार्थ करताना देवाला फक्त भक्ताची भक्ती आणि मनातील भाव महत्त्वाचा असतो हे संतांनी त्यांच्या भक्तीतून आणि कार्यातून जगाला दाखवून दिले.
भगवंताला ही केवळ भक्ताने निर्मळ मनाने केलेली सेवा हवी असते, नाकी त्याची जात, धर्म ,गरिबी श्रीमंती ,याच्याशी काही देणे- घेणे असते.
जसा भक्त भगवंताच्या भेटीसाठी आसुसलेला असतो तसाच भगवंतही आपल्या भक्तांच्या भक्तीचा भुकेलेला केलेला असतो अशी संतानी या जगाला मोलाची शिकवण दिली.
आणि त्यांनी या जगाला हे सिद्ध करून दाखवले.
''माझा आवडता संत'' या निबंध मालिके अंतर्गत आज आपण 'माझा आवडता संत' ''संत ज्ञानेश्वर'' महाराजांबद्दल माहिती करून घेणार आहोत.
माझा -आवडता -संत- ज्ञानेश्वर Maza-Avadata-Sant- Nyaneshwar-best-in Marathi.
|
माझा आवडता संत.
|
संत म्हटलं आपल्याला त्यांनी केलेल्या त्यागाचा, त्यांनी केलेल्या निस्वार्थ भक्तीचा प्रत्येय येतो.. त्यांच्या चरित्रातून अद्वितीय सहनशक्तीचा, सर्वांना समभाव अर्थात एकाच दृष्टीने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो.
सर्व जीव त्या भगवंताचीच लेकरे आहेत त्यामुळे सर्वांना समान दृष्टीने पहा त्यांच्यावर प्रेम करा अशी शिकवण संतांनी दिली.
अशाच महान संतांपैकी एक म्हणजे ''संत ज्ञानेश्वर ''महाराज.
''कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा '' !!
''अवघ्या जगाची माऊली'' ''ज्ञानेश्वर माऊली''
''ज्ञानियांचा राजा माझा ज्ञानेश्वर''.
संत ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर, ज्ञानदेव माऊली,या नावाने देखील संबोधले जाते.
संपूर्ण वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला.
'सगळ्या संत जनांची आई' ,'ज्ञानेश्वर माऊली'.
''संत ज्ञानेश्वर''महाराजांच्या विचारांचा वारसा,पुढे संत तुकाराम ,संत नामदेव ,संत एकनाथ, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई, चोखामेळा. यांनी अविरत पुढे नेला.
'अवघाचि संसार सुखाचा करीन !
आनंदे भरिन तिन्हीलोक !!
माझा -आवडता -संत- ज्ञानेश्वर-Maza-Avadata-Sant-Nyaneshwar
जन्म;-संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीकाठी वसलेल्या 'आपेगाव' नावाच्या छोट्याशा गावात श्री विठ्ठल पंत कुलकर्णी आणि सौ रुक्मिणी बाई विठ्ठल पंत कुलकर्णी यांच्या घरी श्रावण कृष्ण अष्टमी गुरूवार इ;स 1275 मध्ये झाला.
बालपण;- लहानपणापासूनच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. त्यांना लहानपणापासूनच परमार्थाची आवड होती.
संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच पुढे जाऊन संत ज्ञानेश्वरांचे गुरु बनले.
निवृत्तीनाथ ,सोपानकाका ,मुक्ताबाई ज्ञानेश्वरांची भावंडे,, ज्यामध्ये निवृत्तीनाथ हे थोरले बंधू आणि सोपान काका आणि मुक्ताबाई ही धाकटी भावंडे होती.
|
माझा आवडता संत. |
ज्ञानेश्वर महाराज हे महायोगी ,महाज्ञानी होते परंतु समाजातील कर्मठ लोकांनी त्यांच्या या ज्ञानाचा कधीही स्वीकार केला नाही.
उलट संन्याशांची मुले म्हणून त्यांचा पावलोपावली तिरस्कार व त्यांच्यावर अत्याचार केला. पण संत ज्ञानेश्वरांनी व त्यांच्या भावंडांनी कधीही त्याचा राग मनात धरला नाही, उलट ते लोक कल्याणासाठी सतत धडपडत राहिले.
आई-वडील;- 'संत ज्ञानेश्वर' यांचे वडील ''श्री विठ्ठल पंत कुलकर्णी ''हे परमार्थिक विचारांचे मनुष्य आणि महान विठ्ठल भक्त होते.
त्यांची पत्नी रुक्मिणीबाई कुलकर्णी या प्रेमळ स्वभावाच्या होत्या.
विवाहाला अनेक वर्ष लोटूनही श्री विठ्ठल पंत आणि रुक्मिणी बाई यांना संतान प्राप्ती होत नव्हती.
हळूहळू श्री विठ्ठल पंतांचे मन हे संसारामध्ये रमेना. त्यांच्या मनात वैराग्य भाव उत्पन्न झाला. आणि त्यांनी संसारिक सुखदुःखातून मुक्त होण्याचे ठरवले.
आणि एके दिवशी आपल्या पत्नीला काही न सांगताच श्री विठ्ठल पंत हे घरातून बाहेर पडले. आणि ते श्री महादेवांची नगरी काशी मध्ये आले.
''माझा आवडता संत''
काशीमध्ये येऊन श्री विठ्ठल पंतांनी संन्यास आश्रम स्वीकारला. इकडे रुक्मिणी बाईंनी सर्व ठिकाणी श्री विठ्ठल पंतांचा शोध घेतला मात्र, त्यांच्या हाती निराशे पेक्षा जास्त हाती काही लागले नाही.
काळ लोटला अशाच एके दिवशी श्री विठ्ठल पंतांचे गुरु यांना श्री विठ्ठल पंत हे विवाहित आहेत आणि ते आपल्या पत्नीला आणि आपले घरदार सोडून इथे आले असल्याचे समजले.
त्यांनी विठ्ठल पंतांना समोर बोलावले. आणि प्रश्न केला,
"विठ्ठलपंत तुम्ही विवाहित आहात"?, यावर विठ्ठलपतांनी आपली मान डोलावली, मग तुम्ही आपला संसार अर्ध्यावर सोडून संन्यास का घेतला असा प्रश्न गुरूंनी केला.
तेव्हा संसारामध्ये आपले मन रमत नव्हते म्हणून मी संन्यास घेतला असे उत्तर श्री विठ्ठल पंतांनी आपल्या गुरुनां दिले.
यावर त्यांचे गुरु श्री विठ्ठलपंतांना म्हणाले, विठ्ठल पंत तुम्ही हे बरोबर नाही केले, संसारी माणसाने संसाराच्या मार्गावरच परमार्थ करायाचा असतो, तुम्ही इकडे संन्यास घेतला खरा पण तुमच्या घरी तुमची पत्नीची काय अवस्था असेल याचा तुम्ही कधी विचार केला का ?
तुमची पत्नी तुमच्या वाटेकडे डोळे लावून तुम्ही घरी परत येण्याची वाटपाहत बसली आहे, तेव्हा तुम्ही आत्तापासून पुन्हा संसारात प्रवेश करा हा तुमच्या गुरुचा आदेश आहे.
गुरुआज्ञा मानून श्री विठ्ठल पंत पुन्हा आपल्या घरी परतले आणि त्यांनी पुन्हा संसार सुरू केला.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली 'संन्याश्च्याच्या संसाराला पुन्हा सुरुवात' .
धर्मसभा बोलवण्यात आली विठ्ठल पंतांना तेथे बोलवण्यात आले. आणि सर्वधर्म पंडितांनी मिळून निर्णय घेतला विठ्ठल पंत यांच्या परिवाराला वाळीत टाकण्याचा निर्णय !
विठ्ठलपंतांनी गया -वया केली हात जोडले पण निष्ठुर धर्म पंडितांनी त्यांचे काही एक ऐकले नाही आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकला.
विठ्ठल पंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई हे गावापासून दूर छोटीशी झोपडी करून राहू लागले.
कालांतराने रुक्मिणीबाईंंना दिवस गेले, आणि त्यानंतर पहिल्यांदा निवृत्तीनाथ नंतर ज्ञानेश्वर, सोपान काका ,सगळ्यात शेवटी मुक्ताबाई यां भावंडांचा जन्म झाला.
माझा -आवडता -संत- ज्ञानेश्वर-Maza-Avadata-Sant-Nyaneshwar-best-in-Marathi.
धर्मपंडितांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची मूंज करण्यास नकार दिला .
विठ्ठलपंतांनी गयावया केलीपण त्याचा काही एक उपयोग झाला नाही .त्यानंतर धर्मपंडितांनी पुन्हा धर्मसभा बोलावली.
धर्मसभेत विठ्ठलपंतांनी यावर उपाय काय असे विचारले असता धर्मपंडितांनी त्यांना देह दंडाची शिक्षा सुनावली.
आपली मुले सामाजिक रितीरिवाज आणि संस्कारांपासून वंचित राहू नयेत म्हणून श्री विठ्ठल पंतांनी या शिक्षेचा स्वीकार केला.
एकदा सर्वजण त्र्यंबकेश्वरला गेले असताना निवृत्तीनाथ परिवारापासून बिछडले ,या कालावधीत निवृत्तीनाथ हे गहिनीनाथांसेबत त्यांच्या गुहेत राहिले.
त्यानंतर जेव्हां निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांची पुन्हा भेट झाली तेव्हां. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्यांना मिळालेले सर्व ज्ञान सांगितले.
ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना आपले गुरु करून घेतले. काही काळ लोटला.
आणि एके दिवशी रात्रीच्या वेळेस त्यांची मुले गाढ निद्रा मग्न अवस्थेत असताना श्री विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी बाईंनी इंद्रायणीच्या डोहात जलसमाधी घेतली.
माता पित्याच्या देहवसनानंतर सर्व भावंडाची जबाबदारी ही संत ज्ञानेश्वरांवर आली. निवृत्तीनाथांपेक्षा धाकटे असूनही त्यांनी ही जबाबदारी स्वत: आनंदाने स्वीकारली.
पण कर्मठ समाज्याने तरीही त्यांचा स्वीकार केला नाही आणि संन्याश्च्याची मुले म्हणून त्यांना वाळीत टाकले.
संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांनी पावला पावलावर त्रास दिला, पण ज्ञानेश्वर हे लोककल्याणासाठी सतत धडपडत राहीले.
'' सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन !
क्षेम मी देईन पांडुरंगी '' !!
''बाप रखुमादेवीवरु विठ्ठलेची भेटी !
आपुले संवसाटि करुनी राहे !!
संत ज्ञानेश्वर यांनी अनेक चमत्कार केले, मग ते रेड्याच्या तोंडातून वेद बोलवणे असो, वा मग चांगदेवांच्या भेटीसाठी निर्जिव भिंत चालवणे असो.
जेव्हां काही धर्मपंडितांनी ज्ञानेश्वरांना रेड्याची उपमा दिली, आणि रेडा तर सामान वाहण्याची काम करतो तो काय ज्ञान शिकवणार असे म्हटले.
तेव्हां ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या तोंडातून वेद बोलावले, आणि आपल्या आध्यात्मिक शक्तीचा परिचय दिला.
माझा -आवडता -संत- ज्ञानेश्वर-Maza-Avadata-Sant-Nyaneshwar-best-in-Marathi.
'' सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी !
कर कटेवरी ठेवुनिया !!
रचना;- संत ज्ञानेश्वरांनी बाराशेहून अधिक अभंगांची रचना केली.
संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ''ज्ञानेश्वरी'' सारख्या महान ग्रंथांची रचना केली. ज्यामध्ये 900 ओव्या आहेत.
|
संत ज्ञानेश्वर. |
त्यानंतर त्यांनी हरिपाठ, पसायदान, अमृतानुभव(800ओव्या) यांची ही रचना केली.
'.संत ज्ञानेश्वर ' यांनी अनेकांचे गर्वहरण देखिल केले.
कार्ये;- जेव्हां काही धर्मपंडित लोकांच्या भडकवण्याने महा तपस्वी चांगदेव महाराज आपल्या असंख्य सेवकऱ्यांसोबत संत ज्ञानेश्वरांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या भेटीला आले.
चांगदेव महाराज हे वाघावर स्वार होऊन आपल्या भेटीसाठी येत आहेत हे जेव्हां ज्ञानेश्वरांना समजले तेव्हां ते एका भिंतीवर आपल्या भावंडांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यांनी त्याच भिंतीला चलण्याची आज्ञा केली.
त्यांच्या आज्ञेने निर्जीव भिंत सुद्धा चालू लागली. ज्ञानेश्वरांना निर्जीव भिंतीवर येत असलेले पाहून चांगदेवांना आश्चर्य वाटले आणि त्यांना ज्ञानेश्वरांच्या सामर्थ्याचा परिचय आला.
तेव्हां चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वरांच्या पायावर लोटांगण घातले.
''पंढपुरीचा लावण्याचा पुतळा !
विठो देखियला डोळा बाईयेवो '' !!
'' वेधले वो मन तयाचिया गुणि !
क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे '' !!
''पौर्णिमेचे चांदणे क्षणाक्षणा होय उणे !
तैसे माझे जिणे एक विठ्ठलेंविण '' !!
'' बापरखुमादेवीवरू विठ्ठलुचि पुरें !
चित्त चैतन्य मुरे बाईये वो '' !!
संत ज्ञानेश्वरांनी अनेक लोक कल्याणाची कामे केली. संत ज्ञानेश्वर असेच फिरत फिरत आपल्या भावंडांसोबत पंढरपूरला आले तिथे त्यांना संत एकनाथांच्या रूपाने एक शिष्य आणि परममित्र भेटला.
हळूहळू लोकांना संत ज्ञानेश्वरांच्या दिव्यत्वाची जाणीव झाली.
समाजाने संत ज्ञानेश्वरांचा त्यांच्या भावंडांन सकट पुन्हा समाज्यात स्वीकार केला .
परमार्थ कसा करावा हे खऱ्या अर्थाने संत ज्ञानेश्वरांनी लोकांना शिकवले.
''संत ज्ञानेश्वर'' यांचे विचार आजही लोकांना प्रेरित करतात. जे त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये रुजवले होते.
संजीवन समाधी;- अवघ्या जगाला ज्ञानाचे, भक्तीचे दान देऊन,
संत ज्ञानेश्वरांनी 2 डिसेंबर कार्तिक कृष्ण त्रयोदशी रविवार इ:स शके 1296 रोजी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी इंद्रायणी काठी जिवंत समाधी घेतली.
त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या भावंडांनी ही पुढील वर्षभरात आपल्या देहाचा त्याग केला.
तेव्हांपासून
संत ज्ञानेश्वर संजिवनी समाधी सोहळा हा दरवर्षी कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्या पर्यंत आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो.
या संजीवनी सोहळ्यामध्ये लाखोच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात.
तसेच आषाढ महिन्यामध्ये
संत ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर हा पालखी सोहळा डोळ्यांचे पारणा फेडण्या सारखा असतो.
. |
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा |
ज्यामध्ये दरवर्षी चार लाखांच्यावर भाविक सहभागी होत असतात. '' ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम '' !
'' ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम '' ! असा जयघोष करत आळंदी ते पंढरपूर असा हजारो किलोमीटरचा प्रवास करतात.
संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच लगभग चाललेली असते.
अशा या संत ज्ञानेश्वरांना कोटी कोटी नमन
!!
!! पसायदान!!
आतां विश्वात्मके देवे ! येणे वाग्यज्ञे तोषावे !
तोषोनि मज द्यावे ! पसायदान हे !
जे खळांचि व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रती वाढो !
भूतां परस्परे पडो ! मैत्र जीवांचे !
दुरितांचे तिमिर जावो ! विश्व स्वधर्म सूर्ये पाहो !
जो जे वांछील तो ते लाहो ! प्राणिजात !
वर्षत सकळ मंडळी ! ईश्वरनिष्ठांची मांदियाळी !
अनवरत भूमंडळी ! भेटतु भूता !
चला कल्पतरूंचे आरव ! चेतनाचिंतामणींचे गाव !
बोलती जे अर्णव ! पीयूषांचे !
चन्द्रमेंजे अलांछन ! मार्तण्ड जे तापहीन !
ते सर्वाही सदा सज्जन ! सोयरे होतु !
किंबहुना सर्व सुखी ! पूर्ण होवोनि तिहीं लोकी !
भजिजो आदिपुरुषीं ! अखण्डित !
आणि ग्रंथोपजिवीये ! विशेषी लोकी इये !
दृष्टादृष्टविजये ! होआवेजी !
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो ! हा होईल दानपसावो !
येणे वरे !ज्ञानदेवो सुखिया झाला.
!!....;:संत ज्ञानेश्वर महाराज.
0 टिप्पण्या
हि वेबसाईट कोणतीही त्रुटी पूर्ण टिप्पणी स्वीकारत नाहीत.य़ाची कु्पया नोंद घ्यावी.